फलटणच्या संजीवराजेंनी मोहिते पाटलांचे टेन्शन वाढवले!

फलटणच्या संजीवराजेंनी मोहिते पाटलांचे टेन्शन वाढवले!

विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून माढ्याचे खासदार आहेत. मात्र पक्षातून त्यांना विरोध आहे.

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून लढण्यासाठी अद्यापही कोणाचे नाव निश्‍चित झाल्याचे आम्हाला माहिती नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदेश देवून पक्षाची उमेदवारी दिली तर लढण्याची तयारी आहे, असे सुतोवाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

सातारा जिल्हयातील फलटण, माण विधानसभा माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

माढ्यातून कोणाचे नाव निश्चित होणार याबाबत पुण्यात खलबते सुरू असतानाच आता संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तयारी दर्शविली आहे. 

याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता संजीवराजे म्हणाले, "पक्षाने उमेदवारी दिली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे. शरद पवार राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचा जो उमेदवार निश्‍चित करतील, त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत. त्या उमेदवारास निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून कोणाचे नाव निश्‍चित झाल्याची आम्हाला माहिती नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com