भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षांनी गद्दारी केली! 

"पलूस कडेगाव मतदारसंघात पृथ्वीराज देशमुख जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नाहीत, त्यांना या मतदारसंघात त्यांच्याशिवाय दुसरा सक्षम विरोधक तयार होऊन दयायचा नाही "असेही विभुते म्हणाले.
भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षांनी गद्दारी केली! 

पुणे : "भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी युतीचा धर्म पाळला नाही, गद्दारी केली. त्यांनी युतीधर्म पाळला नाही म्हणूनच पलूस कडेगाव मतदारसंघात 'नोटा' ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 'नोटा'ला मते वाढली तरी चालतील पण शिवसेना नको, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या कडेपूर गावात 'नोटा'पेक्षा शिवसेनेला कमी मते का मिळाली? असा सवाल शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख आणि पलूस कडेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार संजय विभुते यांनी विचारला आहे.

पलूस कडेगाव मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेला गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी देशमुखांना शिवसेनेकडून लढा असे सांगितले, मात्र देशमुख यांनी कायदेशीर अडचणी सांगून उमेदवारी करण्यास नकार दिला. मला पाठिंबा देतो युतीधर्म पाळतो, असं म्हणाले. पण मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांना युतीधर्म पाळा असे आदेश दिले नाहीत. त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे 'नोटा' चा प्रचार सोशल मीडियावरून करत होते पण देशमुख यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांची समजूत काढली नाही. खुद्द देशमुख यांच्या कडेपूर गावात माझ्यापेक्षा 'नोटा'ला जास्त मते मिळाला ? यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीत देशमुख गटाला इथं चांगली मते मिळत होती मात्र यावेळी का नाही ?"असा सवाल विभुते यांनी विचारला.

"भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पलूस कडेगाव मतदारसंघात शिवसेनेशी गद्दारी केली, तशी आम्ही जर सांगली आणि मिरजेत केली असती तर सांगली जिल्हा भाजपमुक्त झाला असता मात्र आम्ही मूळचे विचाराचे सच्चे कार्यकर्ते आहोत. विचाराला बांधील आहोत. त्यामुळे सांगली मिरजेच्या शिवसैनिकांनी सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांना सहकार्य करत युतीधर्म पाळला. पण भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी फसवले. "असा आरोप विभुते यांनी केला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com