शिरसाट विजयी होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष : एकनाथ शिंदे

..
Sanjay-Sirsath-shinde
Sanjay-Sirsath-shinde

औरंगाबाद : "महायुतीत बंडखोरांना थारा नसल्याचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. बंडखोर उमेदवाराचा विचार करू नका, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याने तुम्ही महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या', असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेना-भाजप महायुतीचे औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ शिंदे यांची गुरुवारी सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांच्या बाबतीत युतीची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत "शिरसाट हॅट्‌ट्रीक साधणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. शिंदे म्हणाले, शिरसाट यांच्या पुढाकाराने शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना आली, बीड बायपाससाठी निधी आला. सातारा-देवळाईसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाले, बजाजनगर भागात विकास कामे झाली असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

दलाली कोणाची करताय?

संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचे नाव न घेता समाचार घेतला. ते म्हणाले, " काही जण फितुरी करत आहेत. दलाली करणारे कार्यकर्त्यांना भेटत आहेत. त्यानंतर मला काहींचे फोन येतात. तुम्ही दलाली करताय? पण कोणाची करताय याचे तरी भान ठेवा. यापुढे कोणी भेटायला आला तर तू किती पैसे घेतले? असा प्रश्‍न करा. आमदार पद असेल नसेल, फरक पडत नाही, पण अंगावर याल तर शिंगावर घ्यायचे हीच बाळासाहेबांची शिकवण आहे ,"असे सांगत शिरसाट यांनी विरोधकांना इशाराही दिला.  

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com