sanjay shinde questions rashmi bagal | Sarkarnama

रश्‍मीदीदी, सासवडहून येऊन करमाळ्यात विधानसभा लढवण्याचा काय अधिकार? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने राजकारण तापलेले असताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी रश्‍मी बागल यांच्यावर टीका केली आहे. 

पुणे: 'मी बाहेरचा आहे' म्हणणाऱ्या रश्‍मी बागल यांना सासवडहून करमाळ्यात येऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केला आहे. 

ते सालसे (ता.करमाळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

संजय शिंदे म्हणाले, 2009 साली बागलांना आमची मते चालली, माक्ष2014 ला मी करमाळ्यातून विधानसभेला उभा राहीलो की मी बाहेरचा कसा झालो? असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला. माझे गाव (निमगांव) करमाळा मतदारसंघात आहे.मझी जमीन करमाळा तालुक्‍यात आहे. मग मी बाहेरचा कसा? मी बाहेरचा आहे म्हणणाऱ्या रश्‍मी बागल दिदींना सासवडहून करमाळ्यात येऊन विधानसभा निवडणुक लढवण्याचा काय अधिकार आहे? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख