sANJAY RAUT VISITS PANDHARPUR | Sarkarnama

अयोध्येनंतर संजय राऊत पोहोचले पंढरपुरात...दुसऱ्या राऊतांना घेऊन!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पंढरपूर : शिवसेनेचे मिशन अयोध्या आता पंढरपुरात पोहोचले आहे. अयोध्येत हे मिशन यशस्वी करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पंढरपूरला भेट दिली. त्यांनी आपल्या सोबत दुसरे खासदार विनायक राऊत यांनाही सोबत आणले होते. 

पंढरपूर : शिवसेनेचे मिशन अयोध्या आता पंढरपुरात पोहोचले आहे. अयोध्येत हे मिशन यशस्वी करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पंढरपूरला भेट दिली. त्यांनी आपल्या सोबत दुसरे खासदार विनायक राऊत यांनाही सोबत आणले होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 24 डिसेंबर रोजी सोमवारी दुपारी एक वाजता चंद्रभागा मैदानावर  जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे चंद्रभागेची महाआरती करणार आहेत. येथील संयोजनाची जबाबदारी आमदार तानाजी सावंत व प्रा. शिवाजी सावंत यांच्यावर आहे. राऊत सध्या शिवसेनेतील इतर नेत्यांना वरचढ ठरत आहेत. सेनेची भूमिका त्यांच्यात मुखातून बाहेर पडत असल्याने इतर नेते नाराज असल्याची चर्चा आहे. आता पंढरपुरातही तेच इतर नेत्यांपेक्षा अग्रभागी राहणार असल्याचे चित्र आहे.

राऊत यांनी घाटावर भेट दिली. तसेच ठाकरे हे चंद्रभागा नदीची आरती करणार असल्याने त्या ठिकाणालाही भेट दिली. पंधरा दिवसांपूर्वीच पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी अयोध्देत जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर शरयू नदीची महाआरती केली होती. अयोध्या दौऱ्यानंतर ठाकरे यांनी पंढरपुरात सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या 24 डिसेंबर रोजी येथील चंद्रभागा एसटी बसस्थानक मैदानावर ही सभा होणार आहे.  

येथे आल्यानंतर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे बॅटिंग केली. धार्मिक अधिष्ठान म्हणून अयोध्येनंतर पंढरपूरची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येतील शरयू नदीवरील महाआरती प्रमाणे पंढरपूरात चंद्रभागेतीरी महाआरतीच नियोजन असून रामराज्य, शिवशाही यावी, यासाठी साकडे घालणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.  विठ्ठल हा गोरगरीब कष्टकऱ्यांचा देव आहे. यांच्या आशिर्वादाने निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेतकरी कर्जमाफीची तयारी केंद्र सरकार करत असेल तर हा निर्णय शिवसेनेच्या दबावाने होत असल्याचा दावा त्यांनी केला. राफेल विमानांच्या व्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाचे मत योग्य आहे. मात्र याच पध्दतीने राम मंदिराचा प्रश्नही बरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख