Sanjay Raut Shivsena MP
Sanjay Raut Shivsena MP

...हम होंगे कामयाब!....शिवसेना अजूनही आशावादी?

शिवसेनेला राज्यात सरकार स्थापनेची राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दिलेली मुदत काय सायंकाळी संपली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याचे पत्रे मिळाली नाहीत त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. पण तरीही शिवसेना नेते संजय राऊत अद्याप काहीतरी होईल, याबाबत आशावादी असल्याचे दिसते आहे.

मुंबई : शिवसेनेला राज्यात सरकार स्थापनेची राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दिलेली मुदत काय सायंकाळी संपली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याचे पत्रे मिळाली नाहीत त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. पण तरीही शिवसेना नेते संजय राऊत अद्याप काहीतरी होईल, याबाबत आशावादी असल्याचे दिसते आहे.

लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संजय राऊत यांनी एक ट्वीट करुन हा आशावाद व्यक्त केला आहे. 
"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।'
बच्चन. 
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे.......
.......असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

काल शिवसेनेची सत्ता स्थापनेची गडबड सुरु असतानाच राऊत लिलावती रुग्णालयात दाखल झाले. पण तिथेही ते राज्यातल्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात पाठिंब्याच्या पत्रावरुन एकमेकांकडे बोटे दाखवणे सुरु असताना दुसरीकडे संजय राऊत मात्र आशावाद व्यक्त करत आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com