Sanjay Raut taunts Sharad Pawar | Sarkarnama

आम्ही दुष्काळी भागात दौरे काढून फक्त मुलाखती देत नाही : संजय राऊतांचा पवारांना टोला 

वैदेही काणेकर 
बुधवार, 15 मे 2019

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तं १८ जिल्ह्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा वरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम शिवसेना करतेय.

मुंबई : " आम्ही  दुष्काळी भागात  दौरे काढून फक्त मुलाखती देत नाही   दुष्काळात आम्ही काय करतोय.  प्रत्यक्षात दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम आम्ही करतोय," असा टोला शिवसेना नेते यांनी शरद पवार यांना लगावला आहे . 

श्री . राऊत पुढे  म्हणाले," विरोधकांना टीका करायला काय जातं ?  अनेक जिल्ह्यात शिवसेनेतर्फे दुष्काळ निवारणाची  कामे  सुरू आहेत. टँकर, चारा छावण्यांचं काम सुरू आहे. पाण्या संदर्भातलं काम सुरू आहे. महाराष्ट्रात दुष्काळ आहे.तिथे  आमची शिवसेना आधीपासूनच काम करतायेत.  आम्ही चारा छावण्या चालवीत आहोत .  महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तं १८ जिल्ह्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा वरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम शिवसेना करतेय."    

केंद्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार म्हणतात त्या प्रमाणे अल्प मतातलं सरकार आले तरी काही फरक पडणार नाही .  या देशात अनेक वेळा अल्पमतातील सरकारांनी पूर्ण पाच वर्ष सरकारं चालवली आहेत.त्याच पद्धतीने आमचे सरकार चालेल. पण आता हे मटक्याचे आकडे लावणं बंद केलं पाहीजे. सरकार हे एनडीएचेच येणार आहे ,   आता २३ मे पर्यंत असे अंदाज व्यक्त केले जातील, सर्वकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत, मला वाटतं एनडीएचं सरकार येईल, अनेक अल्पमतातली सरकारं याआधी टिकली आहेत त्यामुळे अल्पमतातलं सरकार आलं तर टिकेल याबाबत चिंता नाही, असेही ते म्हणाले . 

पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्देवी  आहे .  ईश्वरचंद विद्यासागरांचा पुतळा तोडणे हे चुकीचे  आहे .  याला जबाबदार पश्चिम बंगालचं शासन आहे.  कोणी कोणाकडे प्रचाराला जावं यावर बंधन नाही, ममतांनी मोदी, शाहांना प्रचारासाठी येऊ न देण्याच्या भूमिका होती ममतांना गुजरातमध्ये जाण्यापासून कोणी रोखलं होतं का? असा प्रश्नही श्री. राऊत यांनी उपस्थित केला . 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख