संजय राऊतांचे भाजपच्या जखमेवर मीठ : म्हणे पुढील 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री!

संजय राऊत यांचा आज वाढदिवस: आजही त्यांची जोरदार बॅटिंग
संजय राऊतांचे भाजपच्या जखमेवर मीठ : म्हणे पुढील 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री!

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे रोज एक एक पाऊल आत्मविश्वासने पडत असून आज त्यांनी भाजपच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले. ‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय तर; पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास त्यांनी केला.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या हालाचालींना वेग आला आहे. समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी त्यांच्या बैठकाही झाल्या. त्यासाठीचा मसुदा पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. मी पुन्हा येईन, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या भाषणाची क्लिप सोशल मिडियात व्हारयल झाली होती. तसेच त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याचीच री राऊत यांनी ओढली.

अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्यास नकार देणाऱ्या भाजपला वाकुल्या दाखवत त्याच्या दहापट म्हणजे 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, असे त्यांनी नेहमीच्या स्टाइलमध्ये ठणकावून सांगितले.  

‘किमान समान कार्यक्रमा’वर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आम्ही 24 तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

मी सारखं ‘पुन्हा येईन’-‘पुन्हा येईन’ म्हणत नाही, असं बोलत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. महाराष्ट्राशी आमचं पाच वर्षांचं टेम्पररी नातं नाही. आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार, असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेस नेत्यांचं, वसंतदादा पाटील यांचं स्वातंत्र्यसंग्रामात मोठं योगदान असल्याचं आम्ही कायमच सांगत आलो आहोत, असेही राऊत म्हणाले. वाजपेयी पहिलं सरकार, शरद पवार 1980 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालं ते पुलोद सरकारही संमिश्र होतं. पवार काँग्रेस विचारधारेचे होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप-जनसंघाचे नेते होते, अशी आठवणही राऊतांनी करुन दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com