संजय राऊतांकडे किमान 'सामना'चे संपादकपद तरी द्यायला हवे होते : रामदास आठवले

दिल्लीत झालेल्या दंगलींना काँग्रेस व आम आदमी पार्टीच जबाबदार असल्याचा आरोप रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाण्यात बोलताना केला
Sanjay Raut Should have been made Saamana Editor Say Ramdas Athavale
Sanjay Raut Should have been made Saamana Editor Say Ramdas Athavale

ठाणे : दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहे., त्यांनी ठरवले असते तर ही दंगल थांबू शकली असती, असे  सांगतानाच ज्या संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या राऊत यांच्यावर पक्षाने अन्याय केला. किमान त्यांना सामनाचे संपादक पद तरी द्यायला हवे होते असे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सागितले. 

ते ठाण्यात एका खासगी कार्यक्रमाला आले होते. मनसेचे राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असे सांगून आठवले यांनी दिल्ली दंगलीचा कांग्रेस आणि आम आदमी पक्षाला जबाबदार धरले. या दोन्ही पक्षांनी जर ठरविले असते तर दिल्लीची दंगल भडकली नसती. परंतु, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखी भडकवली. असा आरोपही आठवले यांनी केला. 

केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार, असा सवालही त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी विचारला. मुंबई महानगर पालिका निवडणुकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की रिपाइं पक्षाचा लवकरच मेळावा होणार आहे. येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेत रिपाइं पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. मुंबईचा २०२२ चा महापौर भाजपचाच असेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. तसेच नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला ५-६ जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल असे सांगत पक्ष औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणुकही सन्मानाने लढणार असून इथेही महायुतीची सत्ता असेल असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com