अजित पवार प्रकरणावर संजय राऊत म्हणाले `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे' 

अजित पवारांना यापूर्वीच उपरती झाली असती तर हे सर्व टळले असते का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे.'
अजित पवार प्रकरणावर संजय राऊत म्हणाले `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे' 

मुंबई - अजित पवारांना यापूर्वीच उपरती झाली असती तर हे सर्व टळले असते का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे.' एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी श्री. संजय राऊत बोलत होते. 

अजित पवार यांचे बंड पूर्वनियोजित होते का? अशी विचारणा केली असता श्री. संजय राऊत म्हणाले, `अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत.' 

हे शरद पवारांनी ठरवले होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, `मी मागेही म्हणालो होतो की शरद पवारांना समजावून घ्यायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील.' 

दिग्दर्शक कोण होते? असे विचारले असता ते म्हणाले, `ते जॉइंट व्हेन्चर होते. ते होते, आम्ही होतो, सगळेच होते.' 

दिग्दर्शक - स्क्रिप्ट कोणाचे होते? असे विचारले असता ते म्हणाले, `हे लवकरच कळेल.'  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com