संजय राऊत करणार तीन चित्रपटांची निर्मिती 

संजय राऊत करणार तीन चित्रपटांची निर्मिती 

मुंबई : "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' या पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणखी तीन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. राजकारणासह चित्रपट निर्माते म्हणून नवा प्रवास सुरू करणारे राऊत आगामी तीन चित्रपटांची घोषणा लवकरच करणार आहेत. 

"ठाकरे' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती राऊत करणार आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच यश मिळवले होते. चित्रपटाच्या पुढील भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील लोकांना फारशा माहीत नसलेल्या गोष्टी पाहायला मिळणार आहे; मात्र या चित्रपटासाठी राऊत संपूर्ण नवी टीम घेणार आहेत; यात नवाजुद्दीनही आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले.

प्रमुख भूमिकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. तसेच, राऊत यांना माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावरही चित्रपटाची निर्मिती करायची आहे. या चित्रपटातून फर्नांडिस यांचे कार्य, लढा त्यांचे आयुष्य यासोबतच बाळासाहेबांसोबतचे त्यांचे मैत्रीचे संबंध यावर प्रकाश टाकला जाणार आहे. राऊत यांना "26/11'च्या हल्ल्याबाबत लोकांना माहीत नसलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटाचीही निर्मिती करायची आहे. लवकरच ते या तिन्ही चित्रपटांची औपचारिक घोषणा करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com