शरद पवार पत्रकारांना म्हणाले, ""संजय राऊत खोटं बोलतात असे तुम्ही कसे म्हणू शकता ?'' 

 शरद पवार पत्रकारांना म्हणाले, ""संजय राऊत खोटं बोलतात असे तुम्ही कसे म्हणू शकता ?'' 

पुणे : संजय राऊत हे खासदार आहेत. त्यांची काही मतं असू शकतात ते खोटं बोलताहेत असे तुम्ही कसे काय म्हणू शकता ? असा उलट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकारांना केला. 

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्यावर श्री. पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेत पाऊनतास चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत आजच्या बैठकीविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील घडामोडीबाबत पत्रकारांनी श्री. पवार यांचे लक्ष वेधले. सोनिया गांधींबरोबर जी चर्चा झाली मात्र या चर्चेत शिवसेनेचा विषय नव्हता असे सांगितले. 

शिवसेनेबरोबर जाण्याविषयी काहीही चर्चा झाली नाही असे सांगताना पत्रकारांनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानांकडे पुन्हा लक्ष वेधले. राऊत असे म्हणातात की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. यावर श्री. पवार म्हणाले, की हम तो सबके साथ है ! आपके भी साथ है !यावर पत्रकार म्हणाले, की आमच्याकडे 170 सदस्य आहेत असा दावा करतात. त्यावर श्री. पवार पुन्हा म्हणाले, हा आकडा कुठून आणला हे त्यांना विचारा ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com