बापट अस्सल पुणेकर.. ते जे म्हटले ते खरेच आहे : संजय राऊत

गिरीष बापट हे ज्येष्ठ मंत्री आणि अस्सल पुणेकर आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठांवर आले असून आपण त्यांच्या मताशी सहमत आहोत. बापट जे बोलले ते खरेच आहे, असे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बापट अस्सल पुणेकर.. ते जे म्हटले ते खरेच आहे : संजय राऊत

नाशिक : गिरीष बापट हे ज्येष्ठ मंत्री आणि अस्सल पुणेकर आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठांवर आले असून आपण त्यांच्या मताशी सहमत आहोत. बापट जे बोलले ते खरेच आहे, असे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हे सरकारचे शेवटचे वर्ष आहे, त्यामुळे आताच काय ते पदरात पाडून घ्या, असे वक्तव्य गिरीष बापट यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आपले मत व्यक्त केले. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीसाठी खासदार राऊत येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अन्य विषयांवर बोलताना राऊत म्हणाले, "शेतकरी आत्महत्यांचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रला बसतो आहे. शेतकरी नष्ट होत चालला असतांना शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी कायदा करायला हवा. कृषी खात्याचे वेगळे अर्थसंकल्प असावे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्र आयोजनाची पी. साईनाथ यांची मागणी रास्त आहे. जर तीन तलाखच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्राचे आयोजन का केले जाऊ नये?"

हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू नाशिक झाला आहे असे सांगत उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवर आम्ही सत्तेवर येऊ, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. नाशिक मध्ये पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या मिसळ पार्ट्यांचे आयोजन ही चांगली बाब असून आपणही शनिवारी (ता.13) होत असलेल्या मिसळ पार्टीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

''यापूर्वी टुजी प्रकरणात पुराव्या अभावी संशयीतांची मुक्‍तता झाली. 3 हजार 500 कोटी रूपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यात संशयीत इटली येथील कंपनीला तेथील न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. या निर्णयाचा भारतात सुरू असलेल्या खटल्यावर परीणाम होईल. पुरावे नसतांना आरोप होत असतील तर जनता सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास ठेवणार नाही, याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com