संजय राऊत लखनौमध्ये; आदित्यनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा!

राऊत यांनी आज योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
sanjay raut meets yogi adityanath in luknow
sanjay raut meets yogi adityanath in luknow

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने आज खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमध्ये भेट घेतली. त्याबाबतचे ट्विट राऊत यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी आदित्यनाथ यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा 7 मार्चचा दौरा जाहीर झाल्यानंतर राऊत यांनी, या दौऱ्याकडे राजकीय नजरेने बघू नका. राममंदिर आमच्या आस्थेचा विषय असल्याचे म्हटले होते. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला भेट देऊन रामाचा आशीर्वाद घेतील असे राऊत यांनी म्हटले होते. ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर,"अयोध्येत गेल्यावर ठाकरे यांचा मूळ स्वभाव जागा होईल. त्यांचे हिंदुत्व जागे होईल.' अशी मिश्कील टिप्पण्णी भाजपने केली होती.

यापार्श्वभुमीवर राऊत यांनी आज योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे म्हटले आहे. मात्र भाजप आणि शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेनेचा हा पहिला अयोध्या दौरा असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com