..आणि तो मुलगा मोठेपणी संजय राऊत झाला...

खिडकी उघडला की पाऊस आणि टिव्ही लावला की राऊत, अशी सोशल मिडियात चर्चा रंगली होती. आता पाऊसही गेला. पण राऊत यांचे बरसण्याचे थांबविण्याचे नाव नाही....
..आणि तो मुलगा मोठेपणी संजय राऊत झाला...

पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेनेची बाजू जोरात मांडत असल्याने ते सोशल मिडियातही हिट झाले आहेत. रोज पत्रकार परिषदा घेऊन ते भाजपला नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर भाजप नेते थेट टीका करत नसले तरी त्यांच्या माजी खासदार निलेश राणे हे राऊतांना रोज प्रत्युत्तर देत आहेत.

राऊत यांच्यावर निलेश हे एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. रोज त्यांचा ट्विटहल्ला सुरू असतो. राऊतांच्या दाव्याला खोडून काढण्याचे काम राणे करतात. कधी त्यांना कुस्का म्हातारा ते कधी बोलबच्चन म्हणून हिणवतात. राणे यांच्या टिकेला प्रत्युत्तरही राऊत मात्र देत नाहीत. ते त्याकडे साफ दुर्लक्ष करतात.

सोशल मिडियात मात्र राऊतांनी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकाला राऊतांसारखा एक मित्र हवा. चुकीचे असले तरी त्या मित्राची बाजू मांडणारा, असा मेसेज तर दिवाळीपासून फिरत आहे. बारामतीचा पोपट म्हणूनही त्यांच्यावर टीका होते.  राऊत यांच्यावर अॅंजिंओप्लास्टी झाली. ते लगेच खडखडीत बरे होऊन पुन्हा भाजपवर तुटून पडू लागले. त्यांचा आजार इतक्या वेगाने बरा झाल्याबद्दलही सोशल मिडियात विनोद फिरत आहेत.

त्यातील एक विनोद पुढीलप्रमाणे : 

सरकार कुणाचेही येवो आमची मागणी ,गावोगावी 'लिलावती हॉस्पिटल' च्या शाखा काढाव्यात 
# अँजिओप्लास्टी करुन दिड दिवसात डिस्चार्ज मिळतो!

अन् इकडे डेंग्यू झाला म्हणुन पाचव्या दिवशीही आम्ही दवाखान्यातच

.............

राऊत यांची कर्तबगारी सांगणारा हा किस्सा तर अफलातून आहे....

एक मुलगा आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!

मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.

दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.

मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.

का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
.
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
.
आणि पुढे तो मुलगा संजय राऊत झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com