दिलीप दातीरांच्या पराभवामुळे संजय राऊत झाले बेहद्द खूष

शिवसेना सोडून 'मनसे'वासी झालेले दिलीप दातीर यांच्यामुळे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला अपयशाचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे काल झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा हा प्रभाग राखणे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय होता
Sanjay Raut Congratulates New Corporators from Nashik
Sanjay Raut Congratulates New Corporators from Nashik

नाशिक : शिवसेना सोडून 'मनसे'वासी झालेले दिलीप दातीर यांच्यामुळे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला अपयशाचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे काल झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा हा प्रभाग राखणे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय होता. त्यात तीन हजारांपेक्षा मोठे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत बेहद्द खुष आहेत. नवनिर्वाचीत नगरसेवक मधुकर जाधव यांसह भेटायला गेलेल्या नेत्यांची त्यांनी तोंडभरुन कौतुक करीत पाठ थोपटली.

कालच्या निकालानंतर संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी विजयी नगरसेवक मधुकर चौधरी यांसह स्थानिक पदाधिकारी, नेत्यांसह मुंबईत खासदार राऊत यांची भेट घेतली. यावेळी बदलत्या राजकीय स्थितीला पोषक निकाल लागल्याने ते खुष होते. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन 'मनसे'त प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 'मनसे'तर्फे विधानसभेची उमेदवारी केली. त्यावेळी शहरातील सर्व नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नेत्यांच्या मुकसंमतीने नगरसेवक विलास शिंदे यांची उमेदवारी केली होती. शिंदे यांच्यासाठी सर्वांनीच मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र मतविभागणीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यात दिलीप दातीर हे प्रमुख होते. त्याचा राग शिवसेनेला होता. त्यामुळे दातीर यांचा पराभव शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा होता.

जिल्हा संपर्क प्रमुख चौधरी यांसह विविध नेत्यांनी परिश्रम घेत शिवसेनेसाठी मोठ्या मताधिक्‍याने उमेदवार जादव यांचा विजय संपादन केला. त्याची सर्वच वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली. यावेळी राऊत यांनी नेत्यांची पाठ थोपटत ही घौडदौड सुरु ठेवण्यासाठी काम करा, यश आपलेच आहे. नाशिक महापालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येईल असा विश्‍वास यक्त केला.

दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. मुंबईतील शिवसेना भवन येथे खासदार संजय राऊत यांनी विजयी उमेदवार मधुकर जाधव यांचे अभिनंदन केले. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, नगरसेविका सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, सीमा निगळ, निवृत्ती दातीर, सुधाकर जाधव, आदित्य बोरस्ते, आनंद फरताळे, रोशन शिंदे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com