संजय राऊत 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंशी चर्चा

राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याकरीता 'मातोश्री'वर गेले आहेत. राज्यपालांकडून अधिक वेळ शिवसेना मागेल अशी शक्यता आहे. तसेच एनडीए मधून बाहेर पडण्याबाबतही महत्त्वाची पावले उचलली जातील अशी शक्यता आहे.
Shivsena Chief Uddhav Thakrey and Sanjay Raut Meeting at Matoshree
Shivsena Chief Uddhav Thakrey and Sanjay Raut Meeting at Matoshree

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याकरीता 'मातोश्री'वर गेले आहेत. राज्यपालांकडून अधिक वेळ शिवसेना मागेल अशी शक्यता आहे. तसेच एनडीए मधून बाहेर पडण्याबाबतही महत्त्वाची पावले उचलली जातील अशी शक्यता आहे. 

आज आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद सावंत यांनी जाहीर केले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राऊत आज दुपारी नवी दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर या हालचाली होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. तर मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सुरु आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com