sanjay raut demnds proof from udayanraje | Sarkarnama

छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे उदयनराजेंनी आणावेत : राऊत यांची मागणी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

.....

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केल्यावरून वाद पेटला होता. भाजपने केलेल्या या प्रकारावर आता छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे आणि खुर्च्या सोडाव्यात, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी पवारांच्या दारातील कुत्रा, अशा शब्दांत राऊतांचे नाव न घेता संभावना केली होती. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासाठी छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का, असाही सवाल उदयनराजे यांनी विचारला होता. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राऊत यांचे तोंड आवरायला सांगा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मिडियातून मांडली होती. 

शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिवसेना हे नाव वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता राऊत म्हणाले की उदयनराजे यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान आहेत. आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा परवानगी घेत नाही, असा युक्तिवाद केला. शरद पवार हे जाणते राजे असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख