हो, पण सावंतांची व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही!

गेल्यावर्षी विधान परिषद निवडणुकीत सावंतांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर सहा महिने त्यांचे मंत्रीपद अबाधित ठेवण्यात आले आले.
sanjay raut on deepak sawant
sanjay raut on deepak sawant

मुंबई: फडणवीस सरकारमध्ये आरोग्य मंत्रीपद भुषवलेले डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेवर नाराज आहेत. त्यांनी शिवबंधन सोडण्याची तयारी केली आहे. त्यांच्या या नाराजीला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासंदर्भात राऊत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज आहेत, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर राऊत म्हणाले, दीपक सावंत हे मला भेटायला आले होते. त्यांनी व्य़था मला सांगितली आहे. ती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार नाही, मात्र पक्षप्रमुखांना सांगेन.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखही काम पाहत आहेत, मात्र संजय राऊत यांनी 'सावंतांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडणार नाही, पक्षप्रमुखांकडे मांडेन' असे कां सांगितले, याचा उलगडा होवू शकलेला नाही. 

विधान परिषदेचे तिकीट कापले

दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर जात होते. त्यांना आरोग्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती, मात्र गेल्यावर्षी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर सहा महिने त्यांचे मंत्रीपद अबाधित ठेवण्यात आले, मात्र त्यानंतर दीपक सावंत शिवसेनेत अडगळीतच आहेत. यापार्श्वभुमीवर, आपणाकडे कोणतीही जबाबदारी नसल्याचे काय करायचे, असा जाहीर सवाल सावंत यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com