१०५ कमळांचा हार म्हणजे अमरपट्टा नव्हे : संजय राऊतांचा भाजपला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले देवेंद्र मुख्यमंत्री होतील पण रथाचे चाक रुतले आहे. आणि भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्याप पुढे का आले नाहीत हे रहस्य आहे. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्राचे राजकारण ही एकच व्यक्ती भवती फिरत आहे. - संजय राऊत
Sanjay Raut - Devendra Phadanavis
Sanjay Raut - Devendra Phadanavis

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या समानातून खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कलियुगच खोटं आहे. स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी राजा हरिश्चंद्रने राज्य सोडले, पित्यानेच सावत्र आईला दिलेल्या शब्दासाठी श्रीरामाने राज्य सोडून वनवास पत्करला. त्याच हिंदुस्तानात दिलेला शब्द फिरवण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाने पार पाडले आहे. हे सर्व मुख्यमंत्रिपदावरून घडत आहे. आणि सत्ता स्थापना खोळंबली आहे.'' असे राऊत यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले देवेंद्र मुख्यमंत्री होतील पण रथाचे चाक रुतले आहे. आणि भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्याप पुढे का आले नाहीत हे रहस्य आहे. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्राचे राजकारण ही एकच व्यक्ती भवती फिरत आहे. बाकी सर्व शोभेसाठी आहेत. सत्तास्थापनेसाठी जनादेश मिळूनही रथाचे चाक अहंकाराच्या चिखलात अडकून पडते.''असे राऊत म्हणतात.

''पदांचे समान वाटप असे रेकॉर्डवर बोलण्याचे पुरावे असताना भाजपचे देवेंद्र फडणवीस पोलीस, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी हालचाली करतात. हा  लोकशाहीचा कोणता प्रकार आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो दिवस काळा दिवस म्हणून करणाऱ्यांकडून हे असे घडावे हे आश्चर्य आहे.''अशीही टिका राऊत यांनी केली आहे. 

2014 प्रमाणे शिवसेना सर्व गोष्टी मान्य करीन या भ्रमात सर्व राहिले. तो भ्रम उद्धव ठाकरे यांनी आठ तासात दूर केला.  2014ला शिवसेना सत्तेत गेली. ती घाई आता करणार नाही व फरफटत जाणार नाही. गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते मुख्यमंत्री झाले असते आणि ही कटुता दिसली नसती. एकनाथ खडसे यांना डावलले व संपवले त्यासाठी गिरीश महाजन यांचं प्रयोजन केलं. आता खडसेंच्या मुलीला पराभूत केलं विनोद तावडे यांना घरी बसवलं आणि पंकजा मुंडे यांना पराभूत केलं. तरीही देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापन करू शकले नाहीत'' असाही चिमटा राऊत यांनी काढला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com