Sanjay Raut Comment on Twitter over Rammandir Verdict | Sarkarnama

पहले मंदीर, फिर सरकार.... संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्या मे मंदीर महाराष्ट्र मे सरकार असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटरवरुन राम मंदीर प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतानाच राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार बनेल याचा पुनरुच्चार केला आहे. 

मुंबई : अयोध्या मे मंदीर महाराष्ट्र मे सरकार असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटरवरुन राम मंदीर प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतानाच राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार बनेल याचा पुनरुच्चार केला आहे. 

राज्यात शिवसेना -भाजपमध्ये सरकार स्थापनेवरुन विसंवाद निर्माण झाला आहे. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने राममंदीर प्रकरणात राममंदीर न्यासाची बाजू उचलून धरत राममंदीर बनविण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने या जागेवर सांगितलेली मालकी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. 

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  हे या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. राज्यातल्या सरकारची स्थापना आणि राममंदीर या दोन्ही बाबत ते काय भूमीका घेतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख