sanjay raut challenge to udayranraje about shivji maharaj | Sarkarnama

शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे यांनी आणावे, संजय राऊतांचे जाहीर आव्हान 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे : माजी खासदार उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे आणावे असे जाहीर आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर भूमिका घ्यावी असे म्हटले होते.

काल उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचे नाव घेता टीका केली होती. तसेचे शिव नावावरून शिवसेनेलाही लक्ष्य केले होते. 

या सर्व आरोपप्रत्यारोपाकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, की उदयनराजे काल बोलतात हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही. आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. शिवाजी महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख