सानप अद्यापही संघाचे स्वयंसेवक आहेत :संजय राऊत - Sanjay Raut Balasaheb Sanap talk behind closed doors | Politics Marathi News - Sarkarnama

सानप अद्यापही संघाचे स्वयंसेवक आहेत :संजय राऊत

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सानप आमचे जुने मित्र आहेत.  ते अद्यापही संघाचे स्वयंसेवक आहेत. ते संस्कार जाणार नाहीत -  राऊत

 नाशिक  : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करणारे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोघात काय खलबते झाली याची चर्चा  शहरात रंगली आहे . 

खासदार संजय राऊत कालपासून नाशिक शहराच्या दौ-यावर आहेत. शहरात शिवसेना नगरसेवक विलास शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघात भाजप आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ती शमविण्यासाठी ते चर्चा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. याउलट राऊत यांनी भाजपचे बंडखोर आमदार बाळासाहेब सानप यांची भेट घेतली.

सकाळी त्यांनी पंचवटी सानप यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी सानप आमचे जुने मित्र आहेत. त्यासाठी ही सदिच्छा भेट घेतली. ते अद्यापही संघाचे स्वयंसेवक आहेत. ते संस्कार जाणार नाहीत असे राऊत यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख