Sanjay Raut angry over cabinet extension? | Sarkarnama

मंत्रिमंडळ विस्ताराकडे नाराज संजय राऊत यांनी पाठ फिरवली ? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पुणे : शिवसेनेचे नेते आणि नाराज खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाठ फिरविली असून त्यांचे बंधू सुनील राऊत यांनीही आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी चालवली आहे. 

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेचा किल्ला त्यांनी लढविताना बलाढ्य अशा भाजपला शिंगावर घेतले होते. अगदी सत्तेच्या ताणतणावामुळे ते आजारीही पडले होते. सुनील राऊत यांनी तर विधानसभेत पाय ठेवणार नसल्याची प्रतिज्ञाही घेतल्याचे समजते.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला संजय राऊत उपस्थित होते. आज मात्र संजय राऊत यांनी विस्ताराकडे पाठ फिरविली. संजय राऊत आणि सुनील राऊत हे दोन्ही भाऊ नाराज आहेत. भाऊ सुनील मंत्री होतील असे वाटत होते पण, तसे काही झाले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख