महाविकासआघाडी सरकार विषयी मी व पवार साहेब कॉन्फिडन्ड होतो - संजय राऊत

महाविकासआघाडी सरकार विषयी मी व पवार साहेब कॉन्फिडन्ड होतो - संजय राऊत

नाशिक : शरद पवारांना "ईडी'ची नोटीस आल्यावर ते प्रकरण माझ्या डोक्‍यात गेले. तेव्हाच मी ठरवले की मी गेल्या पाच वर्षांतील हे सरकार घालवले पाहिजे. कारण ते मनमानी करीत लोकशाहीच्या गळ्याला नख लावत होते असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. येथील ऊर्जा प्रतिष्ठाणतर्फे "आमने सामने' या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. राजू परूळेकर यांनी ही मुलाखत घेतली. राज्यात जो सत्तांतराचा प्रयोग झाला त्याबाबत सर्वप्रथम तुम्ही कसे ठरवले ? यावर त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले याचा सर्वाधिक कॉन्फीडन्स फक्त शरद पवार आणि मलाच यांनाच होता. मात्र पवार साहेब यांच्या कामाची एक स्टाईल आहे. ते बोलत होते आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे असे सांगत राहिले. मात्र ती त्यांच्या कामाची स्टाईल आहे. 

ते म्हणाले, राज्यात फडणवीस यांनी ज्या प्रकारचे सरकार चालवत होते ते मुसोलिनी, हिटलर यांच्यासारखे होते. ती महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. अनेकांना धमकावत सरकार चालवण्याची पद्धत अत्यंत गैर आहे. मी लीलावतीत ऍडमीट होण्याचे आधीच ठरले होते असेही यावेळी ते म्हणाले. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, बाळासाहेब सानप, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कॉग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे नेते डॉ प्रदिप पवार आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com