कार्यक्रम उधळण्याच्या धमक्‍यांना घाबरत नाही - संजय राऊत

..................
कार्यक्रम उधळण्याच्या धमक्‍यांना घाबरत नाही - संजय राऊत

पुणे : माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. त्यामुळे कार्यक्रम उधळण्याच्या धमकीला मी घाबरत नाही. शिवसेनेचा नेता म्हणून बेळगावला आलोय जे बोलायचे ते कार्यक्रमात बोलेनच, अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बेळगाव येथे बोलताना स्पष्ट केली. गेल्या आठवडाभरापासून खासदार राऊत यांच्यासंदर्भातून राज्यभरात चर्चा सुरू आहे. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात गदारोळ उठला. त्यांच्यावर चौफेर टीका झाली. या पार्श्‍वभूमीवर बेळगावमधील एका संस्थेच्या निमंत्रणावरून खासदार राऊत बेळगावला गेले आहेत. हा कार्यक्रम उधळण्याची धमकी कर्नाटक सेना या संघटनेने दिली आहे. यावर बोलताना मुळात आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. उरला प्रश्‍न कार्यक्रम उधळण्याचा तर अशा कोणत्याही धमक्‍यांना मी घाबरत नाही. जे काही बोलायचे ते या कार्यक्रमात बोलेनच, असे खासदार राऊत यांनी सांगितले. 

बेळगावबाबत शिवसेनेची भूमिका सुरवातीपासूनच कर्नाटकला मान्य होणारी नाही. या संदर्भात शिवसेना संयुक्त महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते तेही खासदार राऊत येणार असल्याने कर्नाटक सेनेने विरोधाची भूमिका घेतली आहे. राज्यमंत्री संजय पाटील यड्रावकर शुक्रवारी बेळगावला गेले होते. त्यांनाही तेथे धक्काबुक्की करण्यात आली. हा घटना ताजी असतानाच आज खासदार राऊत बेळगावमध्ये पोचल्याने वातावरण गंभीर आहे. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार राऊत बेळगावमधून नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com