'ते' शक्तीप्रदर्शन नव्हे तर सत्याचा प्रयोग : संजय राऊत

आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजभवन ला दाखवू इच्छितो की तुम्ही संविधानाची हत्या केली. ते एक भगतसिंग जे देशासाठी फासावर गेले आणि हे भगतसिंग पहा, देशासाठी फाशी दिली आणि हे भगतसिंग बघा - संजय राऊत
Sanjay Raut Speaks about Gathering of Shivsena Congress NCP Mla Gathering
Sanjay Raut Speaks about Gathering of Shivsena Congress NCP Mla Gathering

मुंबई : काल जे झालं ते शक्ती प्रदर्शन नव्हते. खरे बहुमत कोणाकडे आहे हे कळावं म्हणून काल केलेला सत्याचा एक प्रयोग होता, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या एकत्रिकरणाचे समर्थन केले. राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावरही टिका केली. 

काल मुंबईत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व आमदार एकत्र आले होते. त्यांनी संविधनाचे पालन करण्याची शपथ घेतली. या बाबत राऊत म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजभवन ला दाखवू इच्छितो की तुम्ही संविधानाची हत्या केली. ते एक भगतसिंग जे देशासाठी फासावर गेले आणि हे भगतसिंग पहा, देशासाठी फाशी दिली आणि हे भगतसिंग बघा. बहुमत आमच्याकडे आहे. आज संविधान दिन पाळलं जाईल. पण ज्यांना बहुमत नाही त्यांनी शपथविधी करावा, असे संविधान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही.''

आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय का मागावा लागतो, असा सवाल उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, ''ज्यांनी दावा केला. त्यांनी लपून छपून सत्ता आणि पैशांचा खेळ करून आमच्या आमदारांना तोडायचा प्रयत्न केला. भाजप ला उत्तर देणे हे गरजेचे नाही. महाराष्ट्रात असे अनेक फर्जी लोक आहेत, पण कायद्या नुसार शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहे आणि राष्ट्रवादी चे जयंत पाटील गटनेते आहेत. भाजप ने आता तरी शहाणं व्हावं.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com