sanjay raut about ayodhya verdict | Sarkarnama

संजय राऊत म्हणतात... राममंदिर मार्गी लागले...आता महाराष्ट्रात सरकार!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राऊत यांचा दावा कशाच्या आधारावर?

पुणे : शिवसेनेचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालावर राजकीय निशाणा साधत टिप्पणी केली आहे. 

`पहले मंदिर फिर सरकार!!!
अयोध्या में मंदिर
महाराष्ट्र मे सरकार...
जय श्रीराम!!! `

असे ट्विट करत महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार येणार असल्याचा दावा अप्रत्यक्षरित्या केला आहे. अय़ोध्या निकालावार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अय़ोध्या निकालाचे श्रेय सरकारने घेऊ नये, असा इशारा उद्धव यांनी कालच दिला होता. ते आज संध्याकाळी काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेदाने टोक गाठल्यानंतर अयोध्येचा निकाला या दोन्ही पक्षांत काही समेट घडवून आणणार का, याची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे हे अयोध्येला भेट देणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले.

दरम्यान अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खुला झाला आहे.

 सरन्यायाधीश रंजन गगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने रामजन्मभूमीच्या वादावर निकाल देताना निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्ड यांच्या याचिका फेटाळल्या आहेत.

तसेच रामजन्मभूमी ही या खटल्यातील कायदेशीर व्यक्ती नाही, असेही या निकालात म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाने सादर केलेल्या अयोध्या येथील त्या ढाच्याखालील उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते, यास सर्वोच्च न्यायालयाने दुजोरा दिला.

गगोई यांच्यासह इतर चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. बरोबर साडेदहा हे ऐतिहासिक निकालपत्र देण्यास सुरवात केली. पाचही न्यायाधीशांनी एकमताने हा निकाल दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख