संजय राठोडांच्या `त्या' व्हिडीओवरुन शिवसेना-भाजपचे समर्थक भिडले

संजय राठोडांच्या `त्या' व्हिडीओवरुन शिवसेना-भाजपचे समर्थक भिडले

नागपूर - विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी जाहीर प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते. तो व्हिडीओ भाजपने ट्‌वीटरवर अपलोड केला. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपचे समर्थक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.

महाजनादेश यात्रेच्या वेळी भाजपचेच सरकार येईल आणि फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असेच चित्र होते किंबहुना रंगविण्यात आले होते. त्यामुळे संजय राठोड यांच्याप्रमाणेच शिवसेनेचे इतरही नेते फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाकित वर्तवित होते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जेव्हा 'ईडी'च्या कारवाईचे शस्त्र उगारण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय चित्र हळुहळू बदलायला लागले. आणि शेवटी साताऱ्यांच्या पवारांच्या पावसातील "त्या' सभेने राज्याचे निकाल बदलतील, असे चित्र रंगू लागले. 

निकालाअंती झालेही तसेच. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले खरे. पण त्यानंतर राज्याच्या राजकारणात अशा काही खेळी खेळल्या गेल्या की, ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा दिवसागणिक वाढत गेला आणि अखेर महायुती तुटली. भाजप सत्तेपासून दूर ढकलल्या गेली. त्यानंतर संजय राठोड यांचा तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि शिवसेना आणि भाजपचे समर्थक राठोडांच्या "त्या' वक्तव्यावरुन एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले.

एका नेटकऱ्याने तर "ते' भाषण भाजपवाल्यांनीच लिहून दिले आणि राठोडांना वाचायला सांगितले, असे म्हटले आहे. दुसऱ्याने फडणवीस सेनेच्या आमदारांसाठी प्रचार सभा घेत होते आणि दुसरीकडे सेनेने बंडखोर उभे करुन भाजपचे उमेदवार पाडल्याचे म्हटले आहे. तर काहींच्या मते सध्या सुरु असलेल्या घडामोडींनंतरही महाशिवआघाडीच्या तिन्ही पक्षांत फुट पडेल आणि भाजपप्रणित सरकारच सत्तेत येईल व फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे ट्‌वीट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com