मंत्री संजय राठोड - खासदार भावना गवळी यांच्यात शीतयुद्धाचा भडका

sanjay rathod-bhavna gavli cold war takes next turn
sanjay rathod-bhavna gavli cold war takes next turn

वाशीम : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (ता.30) पार पडला. मात्र, या विस्तारावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार आज (ता.30) पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात संजय राठोड यांची पुन्हा कॅबीनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. संजय राठोड युतीच्या मंत्रीमंडळातही मंत्री होते. ते वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. तेंव्हापासूनच खासदार भावना गवळी व संजय राठोड यांच्यात पक्षांतर्गत शितयुद्ध शिगेला पोचले होते. तसेच जिल्ह्यामध्ये शिवसेनेत दोन गट उघडपणे कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांनी तात्पुरता युद्धविराम केला होता. मात्र, आता संजय राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, या मंत्रीमंडळ विस्तारात पश्‍चिम विदर्भात संजय रायमुलकर किंवा गोपीकिशन बाजोरीया यांचे नाव यायला पाहिजे होते. तशा प्रकारचे लेखी निवेदन खासदार प्रतापराव जाधव, खासदार भावना गवळी, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, गोपीकिशन बाजोरीया, सगळे जिल्हा प्रमुख, माजी आमदार यांसह आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. तरीही हे पद दुसरीकडे गेल्याने आमची निश्‍चितच नाराजी आहे. अशी उघड भूमिका खासदार भावना गवळी यांनी घेतली. मंत्रीमंडळात बुलडाणा किंवा अकोला या जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे, अशी आमची मागणी होती. अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश झाल्याने तुमची नाराजी आहे काय? यावर खासदार भावना गवळी यांनी आमची निश्‍चितच नाराजी असल्याचे सांगितल्याने खासदार भावना गवळी यांचा रोष संजय राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशावर असल्याचे उघड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या मंत्रीमंडळावर शिवसेनेच्याच खासदार भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केल्याने, शिवसेनेतील राठोड विरुद्ध गवळी हे शितयुद्ध जगजाहीर झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com