sanjay nirupam congress mumbai | Sarkarnama

संजय निरूपम यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना बेशरम संबोधले

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई : शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या अनधिकृत व्यायामशाळेच्या बांधकामांविषयी लोकायुक्तांपुढे कबुली दिली असल्याची माहिती पत्रकारांना देताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांनी "बेशरम'पणे निवेदन केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांविषयी निरुपम यांनी अवमानकारक उल्लेख केल्यामुळे आता भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या अनधिकृत बांधकामांविषयी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी पत्रकरांनी संजय निरूपमांकडे विचारणा केली असता बोलण्याच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी बेशरमपणे निवेदन केले असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
न्यायव्यवस्था गळ्यापर्यत जावून पोहोचल्याने शिवसेना मंत्र्यांनी आपल्या अनधिकृत बांधकामांची कबुली दिल्याचे सांगून संजय निरूपम पुढे म्हणाले की, स्वत: मुख्यमंत्रीच अनधिकृत बांधकामांत सहभागी आहे. या विषयावरून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी बेशरमपणे निवेदन करताना अशा प्रकारच्या बांधकामांना नियमित करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगितल्याचे निरूपम यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या मंत्र्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत त्याच्यावर कारवाई न करता त्याला वाचविण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मंत्र्यांचे पाप झाकण्यासाठी इतर पापांनाही नियमित करण्याचे काम सुरू झाले असल्याचा आरोप यावेळी बोलताना निरूपम यांनी केला. 
राष्ट्रपती निवडणूकीनंतर भाजपा शिवसेनेला संपविण्याचे काम करणार असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी यावेळी केला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यापूर्वी अनेकदा मुंबईत येवून गेले आहेत. त्यावेळी त्यांना कधीही मातोश्रीचा रस्ता दिसला नाही. आज राष्ट्रपती निवडणूक असल्याने शिवसेनेच्या मतासाठी भाजपाचे अध्यक्ष मातोश्रीवर गेले असले तरी या निवडणूकीनंतर भाजपा शिवसेनेचा समाचार घेणार असल्याचे निरूपम यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख