हा राजीनामा की वर चढण्याची शिडी? संजय निरूपम यांनी देवरा यांच्यावर परजली तलवार

 हा राजीनामा की वर चढण्याची शिडी? संजय निरूपम यांनी देवरा यांच्यावर परजली तलवार

मुंबई : राजीनामा त्यागाच्या भावनेतून दिला असतो, तो राष्ट्रीय स्तरावर पद मिळावे अशी अट टाकून देणे उचित आहे काय असा प्रश्‍न मुंबई कॉंग्रेसचे माजीअध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. निरूपम यांना हलवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांची मुंबई विभागीय अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. आज त्यांनी दिलेल्या राजीनाम्यातील अप्रत्यक्ष अटींचा उल्लेख करीत संजय निरूपम यांनी पक्षातील गटातटांची कहाणी समोर आणली. देवरा यांनी मुंबईत तीन कार्यकारी अध्यक्ष नेमावेत अशी सूचना केली आहे. 

निरूपम यांनी टवीट व्दारे या सल्ल्यावरही आक्षेप घेतले आहेत. असे तीन जणांचे मंडळ नेमले तर कोणतेही निर्णय प्रत्यक्षात येवू शकत नाहीत, पक्ष योग्य प्रकारे चालूही शकत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरात यांची निवड होणार अशी चर्चा होती पण पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीपर्यंत कोणताही बदल होवू नये असा विचारनव्याने समोर आला आहे. चव्हाण यांनी आपण राजीनामा दिला आहे असे स्पष्ट केले आहेच. 

कॉंग्रेसमधील घोळ निस्तरले जात नसताना नव्याने काही घटनांची चर्चा होते आहे. देवरा यांचा राजीनामा हा विधानसभा निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागेल, कार्यकर्त्यांना पाठबण दयावे लागेल, पक्षाचे भवितव्य फारसे चांगले नसल्याने ही जोखीम का पत्करा या भावनेतून देण्यात आल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी देवरा पक्षातून बाहेर पडून नवा राजकीय घरोबा करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात होते. 9 जुलै रोजी कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यात राहुल गांधींच्या उत्तराधिकाऱ्यासह अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील असे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com