कागल शिवसेनेकडेच, संजयबाबा तुम्ही तयारीला लागा!

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कागलची जागा शिवसेनेला घेण्यासाठी प्रयत्न करु. नवीन नांदी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया.
कागल शिवसेनेकडेच, संजयबाबा तुम्ही तयारीला लागा!

कागल (कोल्हापूर) :  कागलची जागा शिवसेनेसाठी मागायची आहे. माझ्याबरोबर चर्चा झाल्याशिवाय उध्दव ठाकरे या जागेचा निर्णय घेतील असे मला वाटत नाही. माझे मत ते डावलणार नाहीत. तालुक्‍यात निश्‍चितपणाने भगवा फडकवायचा आहे. त्यादृष्टीने तुम्ही कामाला कामाला लागा, असे आश्‍वासन खासदार  सजंय मंडलिक यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना दिले.

जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गैबी चौकात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते अंबरिष घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.

खा. मंडलिक म्हणाले,"संजय घाटगे यांनी विधानसभा सहावेळा लढविली आहे. लोकही मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांच्या अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेला सहकार भूषण, सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाले आहेत. आता सहकार महर्षी पुरस्कार मिळायला हवा. या संस्थेच्या माध्यमातून संजयबाबांनी चांगले काम उभे केले आहे. त्यामुळेच खा. सदाशिवराव मंडलिकांना तालुक्‍याचे आधुनिक भगिरथ मानतात तसेच या पांढऱ्यापट्ट्यात संजयबाबांनाही आधुनिक भगिरथ म्हणतात. या भगिरथाचे पांग फेडण्याची संधी येत्या निवडणुकीत आली आहे. असे सांगून अंबरिष घाटगे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

ते म्हणाले, गेल्या लोकसभेच्या अधिवेशनात मी पन्नास प्रश्न विचारले आहेत. मला संसदरत्न व्हायचे नाही तर लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत, ते सोडवायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली 370 व 35 अ यासारखे धडाकेबाज निर्णय होत आहेत. राजकारणापेक्षा कागल तालुका विकासाचे मंदीर आहे अशी चर्चा राज्याभरात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी राजकारणात नाही. सत्ता हे लोककल्याणकारी साधन असून त्याद्वारे जनसामान्यांचे अश्रु पूसता येतात. सत्ता ही श्रीमंताच्या दारातली गुलाम बनली आहे. सर्वसामन्य कार्यकर्त्यांना मी दैवत मानतो. सदाशिवराव मंडलिक यांच्या आदर्शावर आमची वाटचाल सुरु राहिली आहे. 

अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, संजयबाबा घाटगे हे या तालुक्‍याचे आमदार असावेत हे तुमच्याप्रमाणे माझेही स्वप्न आहे. कार्यकर्ते आमचे दैवत आहे. त्यांचा त्याग आणि संघर्षमय जीवन यातून आम्हाला मोठा आधार मिळालेला आहे. पराभवातून कसे उभे राहायचे हे कार्यकर्त्यांनीच आम्हाला दाखवून दिलेले आहे. सेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे उमेदवारी बहाल करतील. त्यासाठी खा. मंडलिक यांनीही आपले वजन वापरावे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com