अमित शहांच्या सभेला प्रा. मंडलिक गैरहजर; युतीतील बेबनाव उघड 

विधानसभा निवडणुकीतील शिवेसना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात झालेल्या जाहीर सभेला शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी अनुपस्थित राहीले. प्रा. मंडलिक यांची ही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
Sanjay Mandlik
Sanjay Mandlik

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील शिवेसना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात झालेल्या जाहीर सभेला शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी अनुपस्थित राहीले. प्रा. मंडलिक यांची ही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

कोल्हापुरातील शिवसेना-भाजप यांच्यातील विशेषतः भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक आणि शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी 'आपलं ठरलंय' असे म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याऐवजी शिवसेनेचे प्रा. मंडलिक यांना साथ दिली. त्याची परतफेड म्हणून प्रा. मंडलिक हे कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांच्या मागे आहेत. यातून या मतदार संघात तरी युती धर्म मोडल्याचे दिसत आहे. 

यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच प्रा. मंडलिक यांना इशारा दिला होता. 'एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,' अशा शब्दांत त्यांनी मंडलिकांना सुनावले होते. पण, मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य फारसे मनावर घेतले नसल्याचे आजच्या अनुपस्थितीवरून दिसत आहे. लोकसभेत आमदार अमल महाडिक यांनी कुठं माझ्यासाठी प्रचार केला होता,' अशी भूमिका प्रा. मंडलिक यांनी घेतल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून प्रा. मंडलिक हे आजारी असल्याने शहा यांच्या या सभेला अनुपस्थित राहिल्याची माहिती त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कुटुंबियांनी दिली. या सभेला इचलकरंजीचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनीही पाठ फिरवली.

नरके, सरूडकर हेही गैरहजर
या सभेला शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश अबीटकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, भाजपाचे आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर हे उपस्थित होते. पण शिवसेनेचे शाहुवाडीचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दांडी मारली. त्यांच्याही अनुपस्थितीची चर्चा सभास्थळी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com