विधानसभा निवडणुकीच्या गणिताचा संजय मंडलिकांनी केला गौप्यस्फोट...

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे तब्बल सहा संचालक विजयी झाले आहेत. यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर अपक्ष म्हणून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले. कॉंग्रेसचे पी. एन. पाटील व राजू आवळे तर "जनसुराज्य' चे डॉ. विनय कोरे यांचाही यात समावेश आहे.
 विधानसभा निवडणुकीच्या गणिताचा संजय मंडलिकांनी केला गौप्यस्फोट...

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचा कोणीही संचालक उभा राहीला तर त्याला पक्ष, मतभेद न पाहता मदत करण्याचे आमचे अगोदरच ठरले होते, असा गौप्यस्फोट खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज केला. जिल्हा बॅंकेच्यावतीने जिल्ह्यातील तिन्हीही मंत्र्यांचा सत्कार प्रा. मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे तब्बल सहा संचालक विजयी झाले आहेत. यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर अपक्ष म्हणून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले. कॉंग्रेसचे पी. एन. पाटील व राजू आवळे तर "जनसुराज्य' चे डॉ. विनय कोरे यांचाही यात समावेश आहे. 

सहाही आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असूनही त्यांना सहकार्य करण्याचे अगोदरच ठरले होते, असे सांगून प्रा. मंडलिक यांनी चांगलाच गौप्यस्फोट केला. यावरून विधानसभेच्या निवडणुकीतच कोण कोणासोबत होते याचा उलगडा आज झाला. जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत उभे रहायचे असे यड्रावकर यांनी ठरवले होते, कै. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या नातवाला संधी मिळेल असे वाटत होते, पण राजेंद्र विजयी झाले आणि नातवापर्यंत वाट बघायला लागली नाही, असेही प्रा. मंडलिक म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com