घात करायचा हे शिवसेनेने आधीपासून ठरविले होतं, संजय कुंटेंची टीका 

 घात करायचा हे शिवसेनेने आधीपासून ठरविले होतं, संजय कुंटेंची टीका 

मुंबई : घात करायचा हे शिवसेनेने आधीपासून ठरवलं होतं. शिवसेनेने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी केली. जनादेशाचा अवमान केला अशी टीका भाजपचे नेते संजय कुटे यांनी केला आहे. 

मुंबईत भाजपचे अधिवेशन सुरू असून पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अधिवेशनात कुटे यांनी प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात कुटे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. शिवसेनेची स्क्रिप्ट ही आधीच तयार केले होती मात्र ती 24 तारखेनंतर आमलात येण्यास सुरूवात झाली. 

शिवसेनेने 2014 साली कॉंग्रेस सोबत युती करायचं ठरवले होते याचा खुलासा स्वत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चर्चा करून युतीचा समजोता झाला असतां.मात्र शिवसेनेने घात करायचा हे आधीपासून ठरवले होते.म्हणून त्यांनी चर्चा केली नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com