sanjay khodake jouns ncp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

संजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीत

संजय मिस्किन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुंबई : अमरावतीतील काॅंग्रेस नेते संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज हा प्रवेश केला.

मुंबई : अमरावतीतील काॅंग्रेस नेते संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज हा प्रवेश केला.

बडनेराच्या माजी आमदार सुलभा खोडके यांचे ते पती आहेत. 2014 मधे रवी राणा यांना राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी दिल्याने खोडके नाराज होत पक्ष सोडला होता. त्याअगोदर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच ते पक्षात सरचिटणीसपदी कायम होते. 2004 च्या विधानसभा निवडणूकांत पत्नी सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीच्या उमेदारीवर त्यांनी विजयी केले होते. मात्र त्यानंतर मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009 मधे रवी राणा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पराभव केला.

त्यानंतर अमरावती जिल्ह्यात राणा यांनाच राष्टरवादीने झुकते माप दिल्याने खोडके नाराज होते. उत्तम प्रशासक व जनसंपर्क हे संजय खोडके यांचे वैशिष्ट मानले जाते. राष्ट्रवादीमधील सर्व पहिल्या फळीच्या नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबध आहेत. त्यांनी २०१७ मध्ये काॅंग्रेसकडून अमरावती पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख