sanjay kakades ticket cut in bjp sunil tatkare | Sarkarnama

वाचाळविरांना पायबंद घालण्यासाठी काकडेंचे तिकीट कापले ? सुनील तटकरेंची टीका 

उमेश घोंगडे 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पूर्नवसन करण्यासाठी आणि खासदार संजय काकडे यांच्यासारख्या वाचाळविरांना पायबंद घालण्यासाठीच भाजपने काकडे यांचे खासदारकीचे तिकीट कापले असावे, असे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. 

दिल्लीतील पराभवाला वाचाळवीर कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. या पार्श्‍वभूमीवर अनावश्‍यक बोलणाऱ्यांना टाळण्याची भाजपची भूमिका दिसते, असे तटकरे यांनी म्हटले आहे. अधिकार नसतानाही बोलण्यात काकडे पटाईत आहेत. त्यांची ही बाब त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांना खटकली असावी. त्यातून त्यांचे तिकीट कापण्यात आले असावे, असे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे. 

एखाद्या नेत्याचा उपयोग होतो आहे, तोपर्यंत त्याला वापरून घ्यायचा त्यानंतर फेकून द्यायचे ही भाजपची भूमिका आहे. या भूमिकेतूनच खासदार काकडे यांचे तिकीट भाजपने कापले असावे, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राज्यसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावे चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेकडून टीका सुरू झाली आहे. 
---- 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख