आमचा संग आतापर्यंत पाहिला....आता जंग पाहा : संजयकाकांचा विशाल पाटलांना इशारा

आमचा संग आतापर्यंत पाहिला....आता जंग पाहा : संजयकाकांचा विशाल पाटलांना इशारा

सांगली : आतापर्यंत तुम्ही आमचा संग पहिला, आता जंग पहा. तुम्हाला बाळूत्यात असल्यापासून मी बघतोय. आता मैदानात या, आमने-सामने बघून घेऊ, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी आज विशाल पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

भारतीय जनता पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या तयारीसाठी कच्छी जैन भवन मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसकडून सांगली लढण्याची इच्छा व्यक्त केलेल्या विशाल पाटील यांनी नुकत्याच झालेल्या वसंतदादा समर्थक गटाच्या बैठकीसमोर संजय काकांचा उल्लेख 'येडा माणूस' असा केला होता.

आमच्याच दुधावर पोसलेला आता आम्हालाच फणा काढतोय, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले होते. त्याला उत्तर देताना खासदार संजय पाटील यांनी आज जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, अजून लढाई सुरू व्हायची आहे. त्याला मैदानात येऊ द्या. मग आमने-सामने बघून घेतो, असा इशारा संजयकाकांनी दिला.

ते म्हणाले, भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांनी सांगली लोकसभेची चांगली तयारी केली आहे. समोरचा उमेदवार कोण याची आम्हाला काळजी नाही. आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. ताकदिने मैदानावरून सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत.

 दरम्यान भाजप उमेदवाराचा अर्ज  उद्या तारीख 28 रोजी सकाळी 11 वाजता भराला जाणार आहे. त्यानंतर औदुंबर येथे  प्रचाराचा नारळ फोडला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com