sanjay jagtap warns vijay shivtare | Sarkarnama

शिवतारेंनी आधी गुंजवणीचे पाणी आणावे; नंतर मते मागावी : संजय जगताप

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

गराडे : जलसंपदामंत्र्यांनी पुरंदर तालुक्‍यात 200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे जाहीर केले. म्हणजे, जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाला, हे उघड आहे. एका सहीवर "गुंजवणी'चे पाणी आले, असे म्हणत दहा वर्षांत पाणी आले नाही. त्यांनी गुंजवणीचे पाणी आणल्यावरच मत मागावे, असे आवाहन कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी शिवतारे यांना केले.

हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, गराडे आदी भागांत प्रचारासाठी गावभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

जगताप म्हणाले, ""2014 मध्ये जनतेने त्यांना संधी दिली, राज्यमंत्रिपद मिळाले. 30 एप्रिल 2015 रोजी गुंजवणी धरणाच्या पाइपलाइनचे भूमिपूजन करणार, अशा वल्गना केल्या व त्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकल्या. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुंजवणी धरणाच्या पाइपलाइनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ करणार, असे जाहीर केले. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी या प्रकल्पासंदर्भात न्यायालयात केस सुरू असल्याचे सांगितले नाही. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, की त्यांना अचानक साक्षात्कार झाला संजय जगताप यांनी हा प्रकल्प अडविला. हा प्रकल्प पूर्ण करण्यात विजय शिवतारे यांना अपयश आले आहे.''

या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, दत्ता झुरंगे, गौरी कुंजीर, प्रदीप पोमण, डॉ. दिगंबर दुर्गाडे, बापूसाहेब कटके, योगेश फरतडे, एम. के. गायकवाड, ईश्वर बागमार, तानाजी घारे, बबनराव घाटे, प्रकाश फडतरे, गणेशकाका जगताप, माऊली घारे उपस्थित होते.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख