राष्ट्रवादीचे काम जोमात केल्याचा फायदा काॅंग्रेसच्या संजय जगतापांना!

राष्ट्रवादीचे काम जोमात केल्याचा फायदा काॅंग्रेसच्या संजय जगतापांना!

सासवड ः पुरंदर विधानसभा मतदारसंघाची जागा आघाडीअंतर्गत काँग्रेसला व उमेदवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप यांना दिल्याच्या वृत्ताने येथे काँग्रेस वर्तुळात उत्साहाचे वातावरण झाले आहे. जगताप यांनी ही संधी जिंकण्यासाठीच असल्याचे स्पष्ट केले.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून वरिष्ठांचा हवाला देत असा निर्णय झालेला नाही व इतक्यात होतही नसतो. आम्ही राष्ट्रवादीला जागा मिळण्याबाबत कालच पु्न्हा ठराव केल्याचे सांगितले. 

मागील निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे पुन्हा दुसऱयांदा निवडून आले. त्यावेळी क्रमांक दोनची मते काँग्रेसचे संजय जगताप यांना मिळाली. त्यामुळे आघाडीअंतर्गत जगताप यांनाच उमेदवारी मिळेल, असा अंदाज बांधून गावभेट कार्यक्रम त्यांचा सुरु आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे पूर्ण तयारीने लोकसंपर्कात व उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांंनी जगताप यांचे मनापासून कौतुक केले होते. तेव्हाच पुरंदरमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे पुरंदर हा मतदारसंघही काॅंग्रेसला मिळणार असल्याचे सांगण्यात आले.   

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आघाडीअंतर्गत काँग्रेसचे प्रबळ इच्छुक संजय जगताप म्हणाले., राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीअंतर्गत काँग्रेसला व मला ही संधी दोन्ही पक्षांनी दिली आहे. ही संधी दोन्ही पक्षांचा पुरंदरमध्ये योग्य समन्वय असल्यानेच मिळाली.  सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात समन्वय आहे. राज्यातही अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण आदींचा यांचा समन्वय आहे. त्यातून ही निवडणुक एकत्रीत लढून जिंकणारच. मला ही संधी मिळतेय. सुप्रियाताईंसाठी दोन्ही पक्षांनी लोकसभेला केलेले यशदायी काम, काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षाला एकत्रित करुन सुरु असलेल्या सध्याच्या कामामुळे हे शक्य झाले आहे. मागिल वेळी ज्या थोड्या फरकाने माझा पराभव झाला, तो यावेळी यशात निश्चितच वळविण्याची दोन्ही पक्षश्रेष्ठींची अपेक्षा पूर्ण केली जाईल. तालुक्याचे लोकप्रतिनीधी व राज्यमंत्री महोदयांनी 10 वर्षात काहीच केले नाही. त्यातून हे काम आणखी सोपे होईल. 

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यावर प्रतिक्रीयेत म्हणाले., पुरंदरची जागा काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीअंतर्गत दिल्याचा निर्णय झाला नाही. मी आमचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठांशी बोललो आहे. पडद्याआड चर्चा झाली असेल, तरी निर्णय इतक्यात होऊ शकणार नाही.

माजी आमदार अशोक टेकवडेंनी तिकीटच मागितले नाही. तरीही इच्छुकात त्यांचे नाव आले. संभाजी झेंडे साहेब हे इच्छुक आहेत, तरी त्यांचे नाव नाही. याचा अर्थ अंदाजे वृत्ता पसरविले आहे. आघाडीअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने पुरंदरची जागा लढवावी, असा ठराव कालच तालुका संघटनेने पुन्हा केला. तो वरिष्ठपर्यंत पोचवित आहोत. त्यामुळे अंतिम निर्णय पक्ष व पक्षाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार व वरिष्ठच घेतील, असे झेंडे यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com