विजय शिवतारे यांच्या महाराष्ट्र व गुजरातमधील मालमत्तेची चौकशी करावी : संजय जगताप

विजय शिवतारे यांच्या महाराष्ट्र व गुजरातमधील मालमत्तेची चौकशी करावी : संजय जगताप

गराडे : पुरंदरमधील जलयुक्त शिवारातील झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राजीनामा द्यावा. आमदार होण्यापूर्वी तुम्ही काय कामे करीत होता आणि आज अचानक इतके मोठे कसे झाला? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांनी कशा पद्धतीने मालमत्ता मिळविली, याचीही चौकशी शासनाने करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केली आहे.

सासवड ( ता. पुरंदर ) येथे पत्रकार परिषदेत संजय जगताप बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार जगताप, पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, महिला अध्यक्षा व पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते आदी उपस्थित होत्या.

``पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षांच्या काळात केवळ विरोधकांवर आगपाखड, पवार कुटुंबियांवर जहरी टीका केली. मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही काम पूर्ण करता आले नाही. स्वतःच्या तालुक्यात आणि स्वतःच्या खात्यातील कामात भ्रष्टाचार होतो, त्या खात्याचे मंत्रीही हे मान्य करतात. मात्र येथील लोकप्रतिनिधी व मंत्रीमहोदयांना या आरोपांना उत्तरही देता आले नाही आणि स्वतःचे खातेही त्यांना व्यवस्थित सांभाळता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे पुरंदरमधील जलयुक्त शिवारातील झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवतारेंनी राजीनामा द्यावा,``अशी मागणी जगताप यांनी केली.

शिवतारे यांनी दारू, मटका, सावकारी याबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना यांनी स्व. चंदूकाका जगताप (संजय यांचे वडील) यांना जाऊन आता दिड वर्षे झाली असूनही ना. शिवतारे टीका करीत आहेत, मात्र काकांवर त्यांच्या आयुष्यात एक साधी फिर्यादही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नवल्याचा दावा जगताप यांनी केला.

पुरंदमधील सन 2014 ते 2017 या काळातील जलयुक्त शिवार योजनेतील कथित अनियमितता गैरप्रकार, भ्रष्टाचार याबाबत उघड चौकशीची परवानगी मागितली होती. त्यामुळे याबाबतची चौकशी दाबण्याचा प्रयन्त यापूर्वीही झाला होता व यापुढेही होणार असल्याने आम्ही न्यायालयीन लढा देऊन जनतेच्या पैशाचा झालेला अपव्यय दोषींकडून वसूल करणार असल्याचे संजय जगताप यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com