"शिवतारेंनी मुंबईतून पुरंदरमध्ये यावे; म्हणजे जनतेचे हाल कळतील...' 

पुरंदर तालुक्याच्या दुष्काळावरून तेथील राजकारण पेटले आहे. संजय जगताप यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेचीथकीत रक्कम भरण्यासाठी स्वतः तीन कोटी रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांना तालुक्याची काळजी नसल्याची टीका त्यांनी केली.
"शिवतारेंनी मुंबईतून पुरंदरमध्ये यावे; म्हणजे जनतेचे हाल कळतील...' 

सासवड : पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या मुद्यावरून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केला. 

"पुरंदर तालुक्‍यात दुष्काळी स्थिती असल्याने शिवतारेंनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे मोफत पाणी लाभार्थी गावांना सोडावे. ते जमत नसेल तर खात्याची परवानगी द्यावी. आम्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तीन कोटी रुपये भरतो. सर्व गावांना पाणी सोडतोच. तसेच नाझरे धऱणही भरुन दाखवितो,'' असे थेट आव्हान संजय जगताप यांनी आज सासवड येथे दिले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील रास्ता रोकोनंतर खास पत्रकार परीषद घेऊन श्री. जगताप यांनी शिवतारे आणि राज्य सरकारवर टीका केली. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, नंदकुमार जगताप आदी व कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. जगताप म्हणाले, "मुळामुठा नदी वा खडकवासला धरणाच्या कालव्यांमधून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी उचलणे सहज सोपे आहे. ते पाणी नदीतून उचलले व थोडे खराब असले तरी लाभार्थी गावांतील तलाव, ओढ्यांमध्ये सोडले तर ते बऱ्यापैकी निव्वळ होते. हे पाणी नाझरे धरणात प्रवाहाने पोचेल व 788 दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरणही भरेल. टंचाईत हे गरजेचे आहे. मुंबईतून तालुक्‍यात येऊन इथले हाल राज्यमंत्र्यांनी लोकप्रतिनीधी म्हणून पाहावेत. ते जमत नसेल तर आम्ही त्यांना गावोगावी नेऊन लोकांचे हाल दाखवितो. म्हणजे तर डोळे उघडतील.'' 

जानाई- शिरसाई योजनेतूनही असेच पाणी सोडले तर पूर्वेकडील गावांचीही गरज भागेल. मात्र त्यासाठी यांची व त्यांच्या सरकारची इच्छाशक्तीची गरज आहे. त्या खात्याचे हे राज्यमंत्री असूनही पुरंदरच्या पूर्व भागातील लोकांना पिण्याचे पाणी बॅरलमागे 50 रुपयांनी व 20 लिटरच्या जारमागे 30 रुपयांनी विकत घ्यावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. यंदा पाऊस कमी आहे. सासवड, जेजुरी व बोटावर मोजण्याएवढी गावे सोडली तर साऱ्या पाणीयोजना पाण्याअभावी बंद पडल्यात. सहा सप्टेंबरपर्यंत दखल न घेतल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाईळ. आमचे तरी पैसे भरुन पाणी सोडण्याच्या भूमिकेवर कायम असल्याचा दावा त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com