संजय जगताप यांच्या हवेलीत पदयात्रा, सभा

संजय जगताप यांच्या हवेलीत पदयात्रा, सभा

गराडे ः फुरसुंगी (ता. हवेली) येथील वडकी, देवाची उरुळी, फुरसुंगी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, आंबेगाव, औतडवाडी, होळकरवाडी आदी भागांत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या पदयात्रा व प्रचार सभा झाल्या. त्यांना मोठी गर्दी झाली होती.

"गेली 10 वर्षे राज्यमंत्री विजय शिवतारे पुरंदर-हवेलीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी भ्रष्टाचारात पुरंदर-हवेलीच्या जनतेचे नाव खराब केले. घाटाखालील तसेच फुरसुंगीसह हवेलीतील इतर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा डेपो, रस्ते यांसारखे अनेक प्रश्न राज्यमंत्र्यांना सोडविता आले नाहीत. अशा निष्क्रिय आमदाराला घरी बसवा,'' असे आवाहन संजय जगताप यांनी केले.

"आघाडीत बिघाडी नाही. तेव्हा यश आपलेच आहे,'' असे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. "शिक्षण संस्था उभ्या करणार होते. त्यांनी साधी बालवाडीदेखील काढली नाही,'' अशी टीका सुदाम इंगळे यांनी केली.

केंद्रात व राज्यात चुकीचे सरकार असल्यामुळे ईडीच्या माध्यमातून सरकार लांच्छनास्पद कारवाया करीत आहे, असे संभाजी झेंडे यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अशोक टेकवडे, संजय जाधव, अशोक शिंदे, संदीप बांदल, अर्चना कामठे, सचिन घुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दुर्योधन कामठे यांनी केले. सुहास खुटवड यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com