आता आपली सोयरीक झाली आहे, उखाळ्या पाकाळ्या नकोत : खासदार संजय जाधव

आता आपली सोयरीक झाली आहे, उखाळ्या पाकाळ्या नकोत : खासदार संजय जाधव

परभणी : राज्यात शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी स्थापन झाले आहे. त्यामुळे विकासाची दारे खुली होतील. आता आपल्यातही सोयरीक झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या उकाळ्या-पाकाळ्या न काढता, एक दिलाने परभणीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करूयात, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास सुरुवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. 

परभणी महानगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. याठिकाणी कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर कॉंग्रेसचेच भगवान वाघमारे हे उपमहापौर आहेत. उड्डाणपुलाच्या उद्‌घाटन सोहळ्यात महापौर-उपमहापौर या नात्याने दोन्ही पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणात शहरातील विकास कामात कोणीही अडथळा आणू नये, रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणी साठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना इजा पोहोचू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेस सोबत महाआघाडी स्थापन करुन सत्ता मिळवली आहे. या सत्तेचा विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे आता शहरातील विकास कामात कोणत्याही पक्षाने अडथळा आणता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

खासदार संजय जाधव यावेळी म्हणाले की आता आपल्यात सोयरीक झाली आहे. सोयरे कुठे एकमेकांना भांडतात का ? एकमेकांचे पाय ओढतात का ? असे प्रश्न करत आपापसात उखाळ्या पाकळ्या नकाढता विकासासाठी सर्वांनी एकत्र व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्‍टर अशोक ढवण, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, एड. अशोक सोनी, माजी महापौर मीना वरपूडकर, डॉ.विवेक नावंदर आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com