जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्‍चत : संजय घाटगे 

sanjaybaba_ghatge.
sanjaybaba_ghatge.

कोणतीही सत्ता नसताना अनेक वर्षे अन्यायाविरुद्ध स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावरच आवाज उठवला. तालुक्‍यातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा समूळ नायनाट व्हावा हे स्वप्न स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अखेरच्या क्षणापर्यंत पहिले. ते साकार करण्याची संधी माझ्यासह जनतेला आली आहे.

मी अनेक वर्षे संघर्ष करत आलो. नेहमी तत्वाचे व प्रामाणिक राजकारण केले. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. जनता माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित असल्याचे शिवसेना- भाजपा महा युतीचे उमेदवार संजय घाटगे यांनी सांगितले. 

* तुम्ही सहाव्यांदा निवडणुक लढव आहात. या निवडणूकीकडे कसे बघता?

 - आयुष्यात अनेक लढाया पाहिल्या. हार जीत याचा मी कधी विचार केला नाही. सर्वसामान्य माणसांसाठी काम करत राहणे आपला मानस आहे. सर्वसामान्यांसाठी झगडत राहणे हा आपला उद्देश आहे. सत्तेचा वापर लोकहितासाठी किती मोठ्या प्रमाणावर करता येतो, हे मला दाखवून द्यायचे आहे. या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मी या निवडणुकीसाठी सज्ज झालो आहे. 


* भाजपच्या इच्छुक उमेदवाराने बंडखोरी केली आहे. याबाबत आपले मत काय? 

- बंडखोर इच्छुक उमेदवारांची मानसिकताही मला निवडून येऊ द्यायची नाही अशीच आहे. ते माझे मताधिक्‍य घटावे, कमी व्हावे यासाठीच प्रयत्न करीत आहेत; पण त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार नाही. माझी ही शेवटची सार्वत्रिक निवडणुक असून, ही निवडणूक जनतेने, तरुणांनी, आया-बहिणी आणी जिद्दीने पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. जनतेतून परिवर्तनाचे वादळ उठले असून, कोणत्याही परिस्थितीत मी विजयी होईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. 


* समाजातील दीनदलित उपेक्षित घटकांसाठी आपला अजेंडा काय? 

- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा समाज उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यांच्यावरती मोठ्याप्रमाणात अन्याय झालेला आहे. लोकशाहीच्या तत्वानुसार त्यांनाही या देशाचे नागरिक म्हणून येथील सत्ता, संपत्ती यावर अधिकार आहे. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे. 


* कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात? 

- प्रामुख्याने आंबेओहोळ व नागणवाडी हे अपूर्ण राहिलेले प्रकल्प येत्या दोन वर्षात अग्रक्रमाने पूर्ण करणार आहे. उपेक्षित घटकांना न्याय देवून त्यांना स्थिरता देणे. समाजात वाढणारी बेरोजगारीची आपणास जाण असल्याने या घटकासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाचा शाश्वत विकास कसा असतो हे करुन दाखवू. 


*बदलती राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला या निवडणुकीत काय विश्वास वाटतो.? 

- आजच्या तरुणांना बरे, वाईट, चांगले, खोटे याची उत्तम जाण आहे. माझी काम करण्याची सकारात्मक पद्धत समाजातील सर्व घटकांना माहित आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरुणाईसह, आया-बहिणी, ज्येष्ठ कार्यकर्ते विजयासाठी रक्ताचे पाणी करतील याची मला खात्री आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही राजकारण करत असून, ते आमचे दैवत आहेत. 


*राजकारणातील तुमचे विरोधक प्रचंड विकासकामे केल्याचा दावा करतात याबाबत आपले मत काय? 

- मी त्यांच्या कामाबाबत काही बोलणार नाही. मात्र अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिलांच्या उत्कर्षासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. तेरा महिन्यांच्या मिळालेल्या माझ्या आमदारकीच्या काळात नागणवाडी प्रकल्पाची तांत्रिक मंजुरी घेतली; पण विरोधकांकडे वीस वर्ष सत्ता, मंत्रीपद असूनही तो प्रकल्प पूर्ण करता आला नाही.

तसेच आंबेओहोळ सारखाही प्रकल्प त्यांनी पूर्ण केला नाही. हे प्रकल्प पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. कापशी खोऱ्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरणाऱ्या चिकोत्रा नदीस फार मोठा उतार आहे. यासाठी नदीवर लहान लहान बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी बांधील आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दबावाचे काम सुरू असल्याने अनेक उद्योग आपले व्यवसाय बंद करीत आहेत. हे थांबवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com