sanjay dound gets ticket for mlc from ncp | Sarkarnama

बीड जिल्ह्याला मिळणार आणखी एक आमदार!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 14 जानेवारी 2020

....

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीने  संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने या जागेसाठी राजन तेली यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.  माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात यानिमित्ताने तब्बल ३० वर्षांनी आमदारकी मिळणार आहे. 

संजय दौंड हे  ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. दोघा पितापुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्याचवेळी मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला शब्द दिला होता.

दरम्यान आज (दि. १४) विधानभवनात महाआघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील यांसह आदि उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख