राजन तेली व संजय दौंड यांच्यातील सामना झालाच नाही..

dhanajay-munde and sanajy dound
dhanajay-munde and sanajy dound

मुंबई  : महाविकास आघाडीचे उमेदवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी संजय दौंड यांना संधी मिळाली आहे.

भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने माघार घेतली आहे. 

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध असून संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं आहे.  शरद पवार व धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता  व तो शब्द राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देऊन पूर्ण केला.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या संजय दौंड यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात आणखी एक आमदारकी आली असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मिळुन काम करू असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे. परळी तालुक्याला आणखी एक आमदार मिळाला याचा विशेष आनंद असल्याचे सांगत मुंडे यांनी पवार साहेब व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com