sanjay datta | Sarkarnama

संजय दत्तविरोधातील अटक वॉरंट रद्द

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई : निर्माता शकील नुरानी यांनी अभिनेता संजय दत्त याच्यावरोधात नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव होती. या सुनावणीला संजय हजर राहत नसल्याने, दंडाधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. परंतु आज तो अंधेरी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाल्यानंतर त्याच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले. 

शकील नुरानी हे 2002 मध्ये "जान की बाजी' हा चित्रपट तयार करत होते. त्यामधील मुख्य भूमिकेसाठी नुरानी यांनी संजय दत्तला 50 लाख रुपये दिले होते. या चित्रीकरणासाठी संजय दोनच दिवस आला. त्यामुळे पाच कोटीचे नुकसान झाल्याचा दावा नुरानी यांनी केला. तसेच नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर संजयने दिलेला धनादेश वठला नसल्याने नुरानी यांनी पुन्हा अंधेरी दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. सुनावणीसाठी हजर राहण्याचा आदेश दंडाधिकाऱ्यांनी संजयला दोन ते तीन वेळी दिला होता. त्यानंतरही न्यायालयात हजर झाला नसल्याने त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख