जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहणार - संजय बनसोडे

 जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहणार - संजय बनसोडे

उदगीर : मागच्या दहा वर्षापासून अखंडपणे उदगीर विधानसभा मतदार संघातील गावागावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेत आहे. जर जनतेने आशिर्वाद दिला तर मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनतेचा सेवक म्हणूनच कायम करत राहीन अशी ग्वाही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांनी दिली. 

जळकोट तालुक्‍यातील वांजरवाडा, केकत सिंदगी, हावरगा, चाटेवाडी, जिरगा, उमरदरा, होकर्णा, धामणगाव, येलदरा, जगळपुर आदी गावांमध्ये संजय बनसोडे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बनसोडे म्हणाले, भाजपाला दहा वर्षे संधी दिली, आता या निवडणुकीत मला विजयी करून तुमच्या सेवेची संधी द्या. जनतेने आमदार केल्यानंतर उदगीर व जळकोट या दोन्ही तालुक्‍याचा चेहरा-मोहरा बदलून दाखवतो. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत विकासकामे कसे करून घ्यायची याचा मला चांगला अनुभव आहे. 

भाजपाच्या दहा वर्षाच्या काळात उदगीर व जळकोट तालुक्‍यातील विकास कामे रखडलेली आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला अद्याप मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. उदगीर व जळकोट तालुक्‍यात सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा, असे आवाहन करतांनाच जनतेचा सेवक म्हणून काम करत राहीन याचा पुनरुच्चार बनसोडे यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com